लातूर : प्रतिनिधी
श्री गणेश उत्सवाचे औचित्य साधत लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री गणेश चतुर्थी आरती संग्रहाचे प्रकाशन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
या आरती संग्रहाच्या १० हजार प्रती छापण्यात आलेल्या असून लातूर शहर व गणेश मंडळ परिसरात या आरती संग्रहाचे वितरण लातूर शहर युवक काँग्रेसकडून करण्यात येणार आहे. यावेळी अॅड. किरण जाधव, विजयकुमार साबदे, विष्णू धायगुडे, एम.एच शेख, अभिषेक देशमुख, अमन सय्यद यांच्यासह लातूर शहर युवक काँग्रेस पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
















