शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून अनेक भागांत पिके वाळून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतक-यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष माधवराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
शिरुर अनंतपाळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतक-यांना हेक्टरी १ लाख ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, यांचा समावेश आहे. तसेच शेतीसाठी दिवसा आठ तास उच्च दाबाने थ्री-फेज वीजपुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. पावसाअभावी शेतीसोबतच पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि शासनाकडून शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
या निवेदनावर माधवराव बिरादार, मंगेश पाटील, गोविंदराव चिलकुरे, तुळसाबाई जगदीप लोंढे, पंकज रक्षाळे, सतीश शिंदाळकर, सागर मुरूडकर, गणेश खरटमोल, रामदास भुसागरे, जगदीप लोंढे, शहाजीराव पाटील, सुभाष भंडे,अमर माडजे, संतोष डोंगरे, सतीश भिक्का,आशिष धुमाळे,महेश बोळेगावे,संतोष गंगणे, उमाकांत पाटील, प्रसाद पाटील, किशोर जगताप, मोहसीन सय्यद, विकास जागले, अनिल शिंदे, सुनील पाटील, मच्छींद्र भालेकर, धोंडीराम शिंदे, पी. आर. पवार, श्रीधर शिंदे आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित
होते.
















