नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी एका जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुजराती ूमरबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, येथील लोक वेळसोबत बदल स्वीकारत आपल्या सांस्कृतिक वारशाची जोडले गेले आहेत.
डीवाय चंद्रचूड म्हणाले की, स्वप्नांचा विषय निघाल्यानंतर गुजरातच्या भावनांना दर्शवणारी एक मजेदार म्हण आठवते. म्हणतात की जेव्हा सर्व जग नव्या तंत्रज्ञानाच्या मागे धावते, तेव्हा एक गुजराती साध्या गोष्टींना देखील नावीन्य देण्याचा मार्ग शोधून काढतो. उदाहरणार्थ, चहाच्या ब्रेकला एका व्यापार रणनीती बैठकीमध्ये बदलणे हे सर्वोत्कृष्ट गुजराती ुमर आहे असे चंद्रचूड म्हणाले. चंद्रचूड शनिवारी म्हणाले की, न्यायपालिकेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केवळ आधुनिकीकरणासाठी नाही. तर न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना सोप्प जावे यासाठीचे एक पाऊल आहे. यासाठी वकीलांना प्रशिक्षित होणे देखील गरजेचे आहे. न्यायपालिकेतील तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अनेक अर्थाने मदत होत आहे. न्याय हे भौगोलिक किंवा तंत्रज्ञानाविषय कारणामुळे बाधित होणार नाही यासाठी आपल्याला आधुनिकीरणाचा फायदा होईल. चंद्रचूड यांनी यावेळी एआय-आधारित टेक्स्ट टू स्पीच कॉल-आऊट सिस्टम याचे उद्घाटनदेखील केले.