दुष्काळाच्या मागणीवर शेतकरी आक्रमक; आमदार प्रवीण स्वामींवर सोयाबीन फेकले

धाराशिव : प्रतिनिधी
मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, शेतक-यांच्या संतापाचे पडसाद लोकप्रतिनिधींवरही उमटताना दिसत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चादरम्यान उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांना शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त शेतक-यांनी त्यांच्या दिशेने वाळलेले सोयाबीन फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

लोहारा शहरात शेतक-यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. मोर्चेकरी तहसील कार्यालयाकडे जात असताना आमदार प्रवीण स्वामीही तेथे उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन देण्याच्या वेळी काही शेतक-यांनी स्वामी यांना बाजूला करत आपला संताप व्यक्त केला.

लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान आणि महसूल मंडळांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरून दुष्काळसदृश परिस्थिती नसल्याचा प्रशासनाचा निष्कर्ष असल्याचे वृत्त आहे. याच मुद्यावरून शेतक-यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. महसूल मंडळांकडून पावसाचा अहवाल चुकीचा सादर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. दुष्काळ जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक प्रभावी पाठपुरावा करायला हवा होता, अशी भूमिका काही शेतक-यांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार स्वामी मोर्चात सहभागी होताच वातावरण तापले.

आंदोलनादरम्यान संतप्त शेतक-यांनी हातातील सुकलेली पिके आमदार स्वामी यांच्या दिशेने फेकली. त्यातील सुकलेल्या सोयाबीनची पेंडी त्यांच्या डोक्यावर पडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यापूर्वीही आमदार प्रवीण स्वामी यांनी मराठवाड्यातील शेतकरी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांनी दुष्काळ, पीक विमा आणि शेतक-यांच्या नुकसानीबाबत सरकारकडे प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे.

घटनेनंतर आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतक-यांबाबत संयमी भूमिका मांडली. ‘‘शेतक-यांना माझ्यावर रोष व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांनी मला निवडून दिले आहे. त्यांचे माझ्याकडून काही असमाधान झाले असेल,’’ अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण यापूर्वीच केली असून, सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे स्वामी यांनी सांगितले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

‘ज्यांनी माझ्यावर सोयाबीन फेकले त्यांच्यावर मी नाराज नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मी शेतक-यांचा आहे आणि शेतकरी माझे आहेत,’ असेही स्वामी यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्वामी यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या प्रश्नावर आता सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
उमरगा-लोहारा परिसरात यापूर्वीही शेतकरी प्रश्नांवर आंदोलने आणि मदतीच्या मागण्या झाल्या आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतक-यांना ८६ कोटी रुपयांहून अधिक मदत मंजूर झाल्याचेही यापूर्वी वृत्त आले होते. आता लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीवर प्रशासन आणि राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news