पाथरी : महाराष्ट्र राज्य शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय माजलगाव रोड पाथरी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. हा दरबार दर रविवारी सकाळी ११ ते २ ह्या वेळेत भरणार आहे. या जनता दरबारामध्ये थेट सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. आजचा जनता दरबार प्रदेश सचिव शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य आसेफ खान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
आज पहिल्याच दिवशी तालुक्यातील २५ जणांनी त्यांच्या जनता दरबारमध्ये मांडल्या. यापैकी १८ समस्यांचे निराकरण करण्यात आले. या जनता दरबार मध्ये यावेळी असेफ खान यांच्यासह दादासाहेब टेंगसे, युसूफद्दीन अन्सारी, विठ्ठल रासवे, अनिल ढवळे, इरफान शेख, साजेद राज, अहमद अत्तार, मुजीब आलम इत्यादीसह सईद खान यांचे स्वीय सहाय्यक अतुल जत्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.