जगाला श्रीमंत कसे व्हायचे याबाबत सल्ले देणारे पुस्तक लिहिणारा लेखक मात्र कर्जाच्या ओझ्याखाली आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सध्या १.२ अब्ज डॉलर्सचे (९ हजार ९८२ कोटी रुपये)कर्ज आहे.
प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदा-या वाढवतात. मुळात त्यांनी कर्ज घेऊन संपत्ती वाढवलेली असते. मला नेहमी वाटते की, फेरारी आणि रोल्स रॉयससाख्या आलिशान गाड्या म्हणजे तुमची संपत्ती नव्हे. यांना जबाबदा-या मानायला हवे.
कियोसाकी यांची संपत्ती किती?
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की, चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात आणि चुकीच्या कर्जातून कमी कमाई होते. मला वाटते, लोकांनी कर्ज घ्यावीत आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी. माझ्याकडे सध्या १०० मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मी सुद्धा दिवाळखोरी पाहिली आहे.
४ कोटींहून अधिक प्रतींची विक्री
‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक १९९७ मध्ये प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक आजही १०० हून अधिक देशांमध्ये ५० पेक्षाही अधिक भाषांमध्ये हे पुस्तक विकले जात आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या ४ कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.