सोलापूर : कुमठे हद्दीतील होटगी रोड विमानतळाशेजारी असलेल्या ४७ एकर ३६ गुंठे जमिनीपैकी २५ एकर १ गुंठा जमीन ही श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची तर २२ एकर २२ गुंठे जमीन ही विमानतळ प्राधिकरणाची असल्याचा निकाल प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे.
विमानतळाशेजारी असलेल्या जागेची मालकी कोणाची ? याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून वाद प्रलंबित होता. हा वाद प्रांताधिकारी पडदुणे यांच्या निर्णयाने निकाली निघाला आहे. मूळ मालकाची जमीन १३ गुंठे इतकीच असल्याचे निकालात म्हटले आहे. विमानतळाशेजारील जागेसंदर्भात श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने उत्तर सोलापूरचे तहसीलदार व विमानतळ प्राधिकरण यांच्यासह खासगी व्यक्तीच्या विरोधात अपील दाखल करण्यात आले होते. सुररुवातीला याच्या सुनावणीचा विषय अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे होता. त्यानंतर ठोंबरे यांनी हा विषय प्रांताधिकारी पडदुणे यांच्याकडे सोपविला. त्यानुसार पडदुणे यांनी यावर सुनावणी घेऊन हा वाद निकाली काढला आहे.