21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजर्मनीने हमासच्या क्रियाकलापांवर बंदी घातली

जर्मनीने हमासच्या क्रियाकलापांवर बंदी घातली

बर्लिन : जर्मन सरकारने गाझामधील संघटना हमासच्या प्रत्येक क्रियाकलापांवर बंदी घातली आहे. जर्मनीने यापूर्वीच हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. गृहमंत्री नॅन्सी फीझर म्हणाल्या की, आज मी एका दहशतवादी संघटनेच्या कारवायांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या संघटनेचा उद्देश इस्राईलला नष्ट करणे हा आहे. म्हणजे हमासच्या नावाने कोणत्याही प्रकारची सभा घेणे किंवा त्याचा प्रचार करणे हे आता गुन्हेगारी कृत्य मानले जाईल. पॅलेस्टिनी समर्थक समिदुन या गटाचाही जर्मनीतून उच्चाटन करण्यात येईल, असेही फीझर म्हणाल्या. गेल्या महिन्यातच जर्मनीचे चांसलर ओलाफ शॉल्झ यांनी सांगितले होते की, या गटातील सदस्यांनी हमासने इस्राईलवर केलेल्या हल्ल्याचा आनंद जर्मनीच्या रस्त्यावर साजरा केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR