गुवाहाटी : गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने शानदार शतक ठोकले. ‘हिटमॅन’ने आपल्या खास अंदाजात हे शतक साजरे करत चाहत्यांची मने जिंकली. रोहित शर्माने ७५ चेंडूत १०१ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत १० चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. शतक पूर्ण होताच रोहितने नेहमीच्या शैलीत सेलिब्रेशन केले. त्याच्यासोबत गिलनेही शानदार शतक ठोकले.
रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील हे ३५ वे शतक ठरले. शतक झळकावल्यानंतर रोहित फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. ७५ चेंडूत १०१ धावा करून तो बाद झाला. त्याच्या या शानदार खेळीनंतर मैदानात उपस्थित चाहत्यांनी उभे राहून ‘हिटमॅन’ला टाळ््यांचा कडकडाट करत सलामी दिली. दरम्यान, यासोबतच त्याच्या नावावर आता ५२ आंतरराष्ट्रीय शतके झाली आहेत. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये १२ शतके, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली आहेत.
















