26.7 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीची खराब हवा लॉस एंजेलिसच्या प्रदूषणासारखी : एरिक गार्सेटी

दिल्लीची खराब हवा लॉस एंजेलिसच्या प्रदूषणासारखी : एरिक गार्सेटी

नवी दिल्ली : हिवाळा सुरू होताच दिल्लीत वायू प्रदूषण वाढत आहे. भारतातील अमेरिकन राजदूत एरिक गार्सेटी यांनी राजधानीच्या प्रदूषणाची तुलना १९७०-१९८० च्या दशकातील लॉस एंजेलिसच्या प्रदूषित हवेशी केली आहे. ते म्हणाले की, राजधानीतील खराब हवा त्यांना त्यांच्या लहानपणाची आठवण करून देते. लॉस एंजेलिसमधील खराब हवेमुळे लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी ही माहिती दिली.

दिल्लीतील नागरिक वायू प्रदूषणाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना अमेरिकेच्या राजदूतांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अजूनही गंभीर स्थितीत आहे आणि शहरात सलग तिसऱ्या दिवशी धुके पसरले आहे. अमेरिकेचे राजदूत गार्सेटी म्हणाले की, दिल्लीत असे दिवस पाहिल्यावर त्यांना लॉस एंजेलिसमधील त्यांच्या लहानपणाची आठवण येते, जिथे अमेरिकेत हवा सर्वात जास्त प्रदूषित होती. ज्याप्रमाणे आज त्यांच्या मुलीला तिच्या शिक्षिकेने ताकीद दिली होती, त्याचप्रमाणे त्यावेळेस त्यांच्या शिक्षिकेनेही त्यांना बाहेर खेळायला न जाण्याचा इशारा दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR