ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर पंचत्वात विलीन

साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
पुणे/पणजी : प्रतिनिधी
असामान्य अभिनय, भारदस्त आवाज, डोळ््यांतून भावना व्यक्त करण्याची अद्वितीय शैली, साधेपणा आणि माणूस म्हणून सतत जमिनीवर राहून लोकहिताचा ध्यास यामुळे कोट्यवधी प्रेक्षक, लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळील डोणजे गावात रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नानांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

यावेळी अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यासोबतच राजकीय आणि सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर गोव्यातील डोना पावलामधील आपल्या घरी राहायला गेले होते. तेथे गुरुवारी पहाटे राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यानंतर गोव्याहून नाना पाटेकरांचे पार्थिव विशेष एअर ऍम्ब्युलन्सद्वारे पुणे विमानतळावर आणण्यात आले. तिथून रस्तेमार्गे पार्थिव त्यांच्या डोणजे येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, सुनील तटकरे, माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, अर्जुन खोतकर, रुपाली चाकणकर, सदाभाऊ खोत आणि उदय सामंत यांनी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले. अभिनेते मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे, नीना कुलकर्णी, प्रवीण तरडे, सुरेश वाडकर, पुरुषोत्तम बेर्डे, सुशांत शेलार, लेखक अरविंद जगताप यांच्यासह नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाना पाटेकर यांना बुधवारी मध्यरात्री २.३० वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला मेसेज केला. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. पण मेसेज पाहताच ते पहाटे ४ वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णालयातून रुग्णवाहिका मागविली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचे वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

नाना पाटकेर यांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी गमन (१९७८) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परिंदा (१९८९) साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि क्रांतीवीर (१९९४) चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी अग्नी साक्षी, खामोशी : द म्युझिकल, अब तक छप्पन, अपहरण, राजनिती, वेलकम आणि मराठी चित्रपट नटसम्राट यासह अनेक चित्रपटांमध्ये कौतुकास्पद भूमिका साकारल्या. ते एक दिग्दर्शक, लेखकही होते. २०१३ मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले.

सामाजिक कार्यात मोठे योगदान
सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ उभे केले. दुष्काळग्रस्त महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्या, त्यांच्या विधवा, मुलांचे भविष्य, जलसंधारण, रोजगारनिर्मिती, या सगळ््यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष हात घातला. अनेक शेतकरी कुटुंबांना मदत दिली; विधवांसाठी रोजगाराच्या साधनांची उभारणी केली; गावांमध्ये कालवे, नाले, जलसंधारणाची कामे केली.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news