मुंबई : प्रतिनिधी
दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार्सना मिळणा-या चाहत्यांच्या प्रेमाची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही. यामध्ये अग्रस्थानी नाव आहे. ‘थलायवा’ रजनीकांत यांचे. त्यांचे नाव उच्चारातच पडद्यावर त्यांची एक झलक पाहताच थिएटरमध्ये शिट्यांचा पाऊस पडतो! रजनीकांत यांच्या या अभूतपूर्व क्रेझचे शिकार केवळ सर्वसामान्य नागरिकच नाहीत, तर क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज सेलिब्रिटीही आहेत. असाच रजनीकांत यांचा एक ‘डाय हार्ड फॅन’ आहे भारतीय स्टार क्रिकेटर संजू सॅमसन! त्याने रजनीकांत यांच्या नाव चित्रपट ‘जेलर २’साठी चक्क संपूर्ण थिएटरच बूक केले आहे.
कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संघातील सहका-यांसोबत हा सिनेमा पाहता यावा, यासाठी सॅमसनने संपूर्ण थिएटरचा एक शोच बुक केला आहे. याबाबत बोलताना संजू सॅमसन म्हणाला, मला रजनी सरांचे चित्रपट पाहायला खूप आवडतात. मी नेहमीच त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतो. जेलर २ हा चित्रपट मी रिलीजच्या दिवशी पाहू शकलो नाही, कारण आमचा दिल्लीत एक कार्यक्रम होता. त्यामुळे मी एक दिवस उशिरा पाहत आहे. मी त्यांचे जास्तीत जास्त चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतो.
सुदैवाने संपूर्ण थिएटर बुक करता आले
आज सुदैवाने संपूर्ण थिएटर बुक करता आले. मी माझ्या मित्रांना आमंत्रित केले आहे आणि माझी पत्नीही सोबत आहे. मोठ्या पडद्यावर रजनी सरळ बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतीय संघातील तमिळ भाषा समजणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तया शोसाठी आपल्यासोबत येणार असल्याचा खुलासाही सॅमसनने केला. संघातले तमिळ कळते, ते सगळेच सिनेमा पाहायला येत आहेत, असेही त्याने स्पष्ट केले.
















