25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयतिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार १ लाख लाडू

तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार १ लाख लाडू

तिरूमला : प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याच दिवशी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होईल. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, हा सोहळा खास बनवण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थान अयोध्येला १ लाख लाडू पाठवणार आहे.
तिरुपती देवस्थानचे लाडू खूप खास असतात, भाविकांमध्ये या लाडूंची प्रचंड मागणी असते. यामुळेच तिरुपती मंदिराने पाठवलेले लाडू अयोध्येत येणा-या राम भक्तांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे टीटीडीने म्हटले आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून लाखो भाविक २२ तारखेला अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तिरुपतीमध्ये भाविकांमध्ये वाटल्या जाणा-या लाडूंचे वजन १७६ ग्रॅम ते २०० ग्रॅम असते. पण, अयोध्येला पाठवल्या जाणा-या छोट्या लाडूंचे वजन फक्त २५ ग्रॅम असेल. हे लाडू फक्त तिरुमला मंदिराच्या खास स्वयंपाकघरात तयार केले जातील. या स्वयंपाकघरात भगवान व्यंकटेश्वर स्वामींसाठी प्रसाद तयार केला जातो.
टीटीडीचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी म्हणाले की, अयोध्येत येणा-या भाविकांना वाटण्यासाठी आम्ही १ लाख लाडू बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व लाडू तयार झाल्यावर ते अयोध्येला पाठवले जातील. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR