27.5 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeक्रीडामोहम्मद शमी, अदिती स्वामी, ओजस देवतळे यांना अर्जून पुरस्कार प्रदान

मोहम्मद शमी, अदिती स्वामी, ओजस देवतळे यांना अर्जून पुरस्कार प्रदान

बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी खेलरत्न

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी (९जानेवारी) खेळाडूंचा क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला. यातील सर्वात मोठा सन्मान खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना मिळाला.

स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये साता-याची सुवर्णकन्या अदिती स्वामी आणि नागपूरच्या ओजस देवतळे यांनाही अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Ojas Devatale

खेलरत्न पुरस्कार

चिराग शेट्टी – बॅडमिंटन

सात्विक साईराज रँकीरेड्डी- बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार

Aditi Swami

ओजस प्रवीण देवतळे – तीरंदाजी, अदिती गोपीचंद स्वामी – धनुर्विद्या, श्रीशंकर – अ‍ॅथलेटिक्स, पारुल चौधरी – अ‍ॅथलेटिक्स, मोहम्मद हुसामुद्दीन – बॉक्सिंग, आर. वैशाली – बुद्धिबळ, मोहम्मद शमी – क्रिकेट, अनुष अग्रवाल – घोडेस्वारी, दिव्यकृती सिंग – घोडेस्वारी ड्रेसेज, दीक्षा डागर – गोल्फ, कृष्ण बहादूर पाठक – हॉकी, सुशीला चानू – हॉकी, पवनकुमार – कबड्डी, रितू नेगी – कबड्डी, सारीन – खो-खो, पिंकी – लॉन बॉल्स, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर – शूटिंग, ईशा सिंग – शूटिंग, हरिंदर पाल सिंग – स्क्वॅश, अहिका मुखर्जी – टेबल टेनिस, सुनील कुमार – कुस्ती, अंतिम – कुस्ती, रोशी बिना देवी – वुशु, शीतल देवी – पैरा तीरंदाजी, अजय कुमार – अंध क्रिकेट, प्राची यादव – पॅरा कॅनोइंग.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR