28.9 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeक्रीडापाकिस्तानी क्रिकेट संघाच्या तीनही प्रशिक्षकांची हकालपट्टी!

पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या तीनही प्रशिक्षकांची हकालपट्टी!

इस्लामाबाद : वर्ल्ड कप २०२३ च्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात कर्णधारापासून प्रशिक्षकापर्यंत अनेक मोठे बदल झाले. आता पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौ-यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना १२ जानेवारीला होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपले परदेशी प्रशिक्षक मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँर्ड्यू पुटिक यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आशिया कप आणि वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डंने निर्णय घेतला आणि त्यांना सांगण्यात आले की, राष्ट्रीय संघात त्याच्या सेवांची आता आवश्यकता नाही. या तिघांनाही पाकिस्तानी क्रिकेट नियामक मंडळ काही महिन्यांचा पगार भरपाई म्हणून देणार असल्याचे त्यांनी मान्य केले.

पाकिस्तानला मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ३६० धावांनी, दुस-या सामन्यात ७९ धावांनी आणि तिस-या सामन्यात ८ गडी राखून पराभव पत्करावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR