25.4 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeराष्ट्रीयडॉक्टरांनी स्पष्ट कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन देणे आता बंधनकारक

डॉक्टरांनी स्पष्ट कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन देणे आता बंधनकारक

भूवनेश्वर : ओडिशा हायकोर्टाने राज्यातील सर्व डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांना औषधाची प्रिस्क्रिप्शन आणि इतर वैद्यकीय कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात आणि कॅपिटल अक्षरात लिहिण्याचा आदेश दिला आहे.

डॉक्टरांची चिठ्ठी म्हटले की, सर्वसामान्यांना जणू ते नक्षीकामचे वाटते. डॉक्टरांचे झिग-झॅग लिखाण समजणे, हा सर्वसामान्यांसाठी एक टास्कच आहे. पण, आता डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात डॉक्टरांसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ‘झिग-झॅग’ लिहिणे बंद करा, असा आदेश ओडिशा हायकोर्टाने दिला आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांना मोठे आणि महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

आता डॉक्टरांना आता चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्य हस्ताक्षरात किंवा कॅपिटल अक्षरात लिहावी लागतील. राज्यातील सर्व डॉक्टर, खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन, पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य हस्तलिखितातकिंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एसके पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रे, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

खासगीसह सर्वांना सूचना
डेंकनाल जिल्ह्यातील ंिहडोल येथील रसनंद भोई यांचा मोठा मुलगा सौवाग्या रंजन भोई याचा साप चावल्याने झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर हायकोर्टाने हा आदेश दिला आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना स्पष्ट हस्ताक्षर वापरावे, ज्यामुळे औषधांच्या नावे सर्वसामान्यांनाही वाचता येतील आणि कोणतीही संदिग्धता राहणार नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शवविच्छेदन अहवालही असतो किचकट
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अनेक प्रकरणांमध्ये, शवविच्छेदन अहवाल लिहिताना बहुतेक डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रांच्या समजून घेताना अडचण निर्माण होते. न्यायालयालाही अशी वैद्यकीय कागदपत्रे वाचणे कठीण जाते. न्यायालयाने पुढे म्हटले की, डॉक्टरांमध्ये झिग-झॅग हस्ताक्षराचा ट्रेंड बनला आहे, ज्यामुळे सामान्य व्यक्ती आणि न्यायव्यवस्थेला ही कागदपत्रे वाचणे कठीण होत आहे. उच्च न्यायालयाच्या या नवीन आदेशामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे. त्यासोबतच कागदपत्रे वाचणे आणि समजणे सोपे होईल, याची खात्री होईल, त्यामुळे गैरसमज आणि त्रुटींची शक्यता कमी होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR