लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी १२ नोव्हेंबर रोजी शहरातील दयाराम रोड भागातील लाहोटी कंपाऊंड येथे लाहोटी परिवाराकडून आयोजित अन्न कुट महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसाद घेतला.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लक्ष्मीरमण लाहोटी, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, रमेश बियाणी, प्रकाश कासट, श्रीनिवास लाहोटी, गोविंदकुमार लाहोटी, शैलैश लाहोटी, अजय लाहोटी, राजेश लाहोटी, कमल लाहोटी, विशाल लाहोटी, आनंद लाहोटी, आदित्य लाहोटी, सचिन बंडापल्ले, अॅड. किरण जाधव, व्यंकटेश पुरी, अशोक अग्रवाल, रमेश भुतडा, संभाजी रेड्डी, युनूस मोमीन, बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे यांच्यासह लाहोटी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
















