न्यूयॉर्क : अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने अमेरिकेतील राम भक्तांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हयूस्टनमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अमेरिकेतील हयूस्टनमधील ११ मंदिरांचे दर्शन आणि जय श्रीरामचा जयघोष करत राम नामाचे भजन म्हटले गेले. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिकेलाही आमंत्रण दिले गेले आहे.
हयूस्टनमध्ये निघालेल्या शोभायात्रेत २१६ कार होत्या. श्री मीनाक्षी मंदिरापासून ही शोभायात्रा सुरु झाली. त्यानंतर श्री शरद अंबा मंदिरावर पूर्ण झाली. एकूण १६० किलोमीटर ही शोभायात्रा होती.
लिव्हीग प्लानेट फाउंडेशनचे संस्थापक कुसुम व्यास हयूस्टन यांनी म्हटले की, हयूस्टनमध्ये प्रथमच शोभायात्रा निघाली. अंचलेश अमर, उमंग मेहता आणि अरुण मुंद्रा यासाठी पुढाकार घेतला होता. अंचलेश अमर विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत.