परभणी : मानवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे. सावळी येथील महिला शेतात काम करीत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत एका ३० वर्षीय युवकाने तिचा विनयभंग केल्याची घटना दि.३ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी मानवत पोलिस स्टेशनला दि.५ रोजी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाळोदी बिटचे इन्चार्ज भारत नलावडे व त्यांचे मदतनीस तुकाराम नरगरे यांनी आरोपी कृष्णा काळे यास पकडून मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मानवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सावळी येथील महिला शेतात काम करत असताना आरोपीने ती एकटी असल्याची संधी साधून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी महिलेने फिर्याद देताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पाळोदी बीटचे इन्चार्ज भारत नलावडे व त्यांचे मदतनीस तुकाराम नरगरे यांच्याकडे तपास देण्यात आला. गुन्हा दाखल होताच फरार झालेला आरोपी बिड तसेच इतर गावे लोकेशन बदलत फिरू लागल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आरोपी कृष्णा काळेचा शोध घेऊन त्यास सीताफिने अटक करून मानवत येथील मा. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी कृष्णा काळेस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान महिलेच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेत आरोपीस तात्काळ अटक केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार यांचे पोलीस स्टेशन येथे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहेत.