काठमांडू : नेपाळचा स्टार गोलंदाज संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणी ८ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे.
नेपाळ कोर्टाने १७ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. गेल्या महिन्यात लामिछानेला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
आता न्यायालयाने या प्रकरणी संदीपला ८ वर्षाचा तुरूंगवास आणि पीडितेला नुकसान भरपाई, दंड देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय शिशीर राज धाकल यांच्या बेंचने दिला आहे.