प्रभास – पृथ्वीराज या दोघांचा सालार सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने लोकांचं चांगलं प्रेम मिळवलं. इतकंच नव्हे तर सालारने बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली.
प्रभास – पृथ्वीराज यांची मैत्री आपल्या सर्वांना माहितच आहे. प्रभासने पृथ्वीराजच्या आगामी द गोट लाईफ सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते ब्लेसी आणि मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांचा ड्रीम प्रोजेक्ट, द गोट लाइफ.
हा सिनेमा १० एप्रिल २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
निर्मात्यांनी या चित्रपटाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट धाडस म्हटले आहे. हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित आहे.
भारतीय सिनेमात अनेक साहसी कथा बघायला मिळतात. द गोट लाईफ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण रिबेल स्टार प्रभासच्या हस्ते करण्यात आले.
प्रभासने सालारमधील सहकलाकार पृथ्वीराजच्या आगामी सिनेमाचा लूक शेअर केला. द गोट लाइफच्या पोस्टरमध्ये पृथ्वीराज न ओळखता येणा-या, खडबडीत लूकसहमध्ये खलनायकांचा सामना करायला तयार आहे.
द गोट लाइफमध्ये हॉलिवूड अभिनेता जिमी जीन-लुईस आणि अमला पॉल, के.आर. सारखे भारतीय कलाकार देखील आहेत. आगामी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आणि ध्वनी रचना अकादमी पुरस्कार विजेते ए.आर. रहमान आणि रेसुल पुकुट्टी ह्यांनी केले आहे.