34.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमनोरंजन‘अन्नपूर्णी’ने भावना दुखाविल्या; नयनतारावर गुन्हा दाखल

‘अन्नपूर्णी’ने भावना दुखाविल्या; नयनतारावर गुन्हा दाखल

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्नपूर्णी चित्रपटामध्ये नयनताराने महत्वाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवरील अन्नपूर्णी नावाचा चित्रपट हा वादाच्या भोव-यात सापडल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये प्रभु श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते. असा संवाद होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याविषयी उल्लेख केला होता. त्यानंतर आव्हाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करÞण्यात आली होती. आता नयनतारा ही अडचणीत सापडली आहे.

निलेश कृष्णन या नवोदित दिग्दर्शकाने अन्नपूर्णी नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यामध्ये नयनताराने अन्नपूर्णी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार नयनतारासह चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR