32.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये उद्या रोड शो

पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये उद्या रोड शो

दीड लाख लोकांचा सहभाग, प्रशासनाकडून ट्रायल रन

नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. प्रशासनाकडून या महोत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो देखील होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिरची सिग्नलपासून रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत होईल. महामार्गावरील एका बाजूने रोड शो तर दुस-या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक या रोड शोला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे १.२ किमीचे रोड शोचे अंतर असेल.

३० गाड्यांच्या ताफ्याने ट्रायल रन
गुरुवारी रोड या मार्गावरून ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पंतप्रधान मोदींची सुरक्षा व्यवस्था, शासकीय अधिका-यांकडून ट्रायल रन करण्यात आली. सुमारे ३०गाड्यांचा ताफा यावेळी दिसून आला.

सभास्थळी चोख तपासणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR