24.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeक्रीडाराहुल द्रविडचा मुलगा सुसाट!

राहुल द्रविडचा मुलगा सुसाट!

अंतिम सामन्यात घातक गोलंदाजी

भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडने अंडर-१९ कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात घातक गोलंदाजी केली. त्याच्या वडिलांच्या विपरीत समितने फलंदाजीने नव्ह,े तर आपल्या घातक गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्नाटककडून खेळताना समितने आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवले.

कर्नाटकने नाणेफेक जिंकून मुंबईविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर समितने १९ षटकांत दोन महत्त्वाचे विकेट घेतले. त्याने मुंबईच्या धोकादायक दिसणा-या आयुष सचिन वर्तकला ७३ धावांवर बाद केले आणि त्यानंतर प्रतीक यादवला ३० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने १९ षटकांत दोन षटके मेडन टाकत ६० धावा दिल्या. मुंबईचा संघ अखेर ३८० धावांवर बाद झाला. समितच्या गोलंदाजीच्या कामगिरीने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

समितने मुंबईविरुद्धच्या पहिल्या स्पेलमध्ये १० षटके टाकली आणि ४१ धावा दिल्या. मात्र, त्यानंतर त्याने नऊ षटकांत केवळ १९ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. समित गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

त्याने नुकतीच जम्मू-काश्मीरविरुद्ध ९८ धावांची इंिनग खेळली होती. कर्नाटककडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १५९ चेंडूत ९८ धावा केल्या. यामध्ये १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. स्पर्धेच्या चालू हंगामात समितने सात सामन्यांत ३७.७८ च्या सरासरीने ३४० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. या १८ वर्षीय खेळाडूने तीन विकेट्सही घेतल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR