20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयसूचनाकडे सापडले पत्र, लेकाच्या हत्येचे आणखी एक कारण समोर

सूचनाकडे सापडले पत्र, लेकाच्या हत्येचे आणखी एक कारण समोर

पणजी : गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सूचना सेठबाबत आणखी एक खुलासा झाला असून बंगळुरुतील कंपनीच्या सीईओ सूचना सेठ आपल्या मुलासोबत राहत असलेल्या अपार्टमेंटमधून पोलिसांना हाताने लिहिलेले एक पत्र सापडले आहे. या पत्रावरूनच हत्येमागचे कारण समजले आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूचना सेठ राहत असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमधून त्यांना एक पत्र मिळाले आहे. माझ्या पतीने मुलाला भेटण्याचा न्यायालयाने दिलेला आदेश मी सहन करू शकत नाही असे पत्रात म्हटले आहे.

गोवा पोलिसांनी पत्र सील करून हँडरायटिंग एक्सपर्टच्या तपासासाठी फॉरेंसिक सायन्स लेबोरेटरीला पाठवले आहे. यानंतर पोलिसांनी हत्येचे गूढ उकलण्यास सुरुवात केली. सूचना सेठवर आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्या पतीने आपल्या मुलाला भेटू नये असे तिला वाटत होते. इतकेच नाही तर सुत्रांनी असा दावाही केला आहे की मुलाच्या चेह-यावरून सूचनाला तिच्या पतीसोबतच्या नातेसंबंधाची आठवण व्हायची, म्हणून तिने मुलाची हत्या केली.
२०१० मध्ये सूचनाचे लग्न झाले. ती बंगळुरूमध्ये तिच्या पतीला भेटली. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. पतीला दर रविवारी आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर ती नाराज होती. तिने २०२२ मध्ये पती वेंकटरमन विरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता. यामुळे, या प्रकरणातील न्यायालयीन कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की तिने वेंकटरमन यांचे महिन्याचे नऊ लाख रुपये उत्पन्न सांगून दरमहा अडीच लाख रुपयांची मागणी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR