24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू

एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे खबरदारी उपाय म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच कर्नाटकानेही महाराष्ट्रासाठी बस फेऱ्या रद्द केल्या होत्या. आता राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु झाल्या आहेत. तसेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या असून ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे.

सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जाते. दिवाळीमध्ये बसेसअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. विविध मार्गांवर या बसेस धावणार असून जादा बसेस ९ नोव्हेंबरपासून सुटणार आहेत. एसटी महामंडळाच्यावतीने होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी आदी सण-उत्सवाच्या काळात जादा वाहतूक चालवली जाते. या दरम्यान, एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते. एसटी बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसला. विशेष म्हणजे सणासुदीचा काळ असल्याने अनेकजण जण गावाकडे जात असतात. मात्र, बसच बंद असल्याने गावाकडे कसे जावे असा प्रश्न प्रवाशांना बसत होता. तर खाजगी वाहन अधिक पैसे घेत होते.

प्रवाशांचे एसटीला प्राधान्य
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR