सांगोला – कोण म्हणतंय देत नाय…घेतल्याशिवाय राहात नाय, अशा या जोरदार घोषणा देत सांगोला शहर व तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती आवारात आंदोलन केले. तत्पूर्वी मोर्चा काढण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी वे कर्मचारी संघ, शाखा सांगोला यांच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून महिला कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार आणि अंगणवाडी मदतनिसांना २२ हजार मानधन मिळावे, यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघ सांगोला तालुकाध्यक्षा शारदा वाघमारे, संजीवनी शिंदे, संगीता वाघमारे, शोभा जाधव, शारदा माळी, व्होवाळ यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व मिनी सेविका उपस्थित होत्या.