24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रताराचंद रुग्णालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग

ताराचंद रुग्णालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग

पुणे : रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. वस्तीगृहात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मुख्यालय आणि कसबा केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन मजली असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती.

जवानांनी प्रथम विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची खात्री केली. या खोलीतील तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी खोलीत आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या. खोलीमधील हिटरमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR