सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या महायात्रेयाला सुरुवात झाली आहे. या महायात्रेत धार्मिक सलोख्याचे दर्शनही पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड वतीने विजापूर वेस आल्यानंतर मानकरी व नंदीध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराजांच्या यात्रेत सात नंदीध्वज मिरवणूक मार्गाने जातात. हेच सर्व सात नंदीध्वज,मानकरी विजापूर वेस येथं पोहोचताच मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळणं करण्यात आली .
२५ वर्षांपासूनही परंपर कायम असून ती पुढेही चालू ठेवू अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष हाजी मतीन बागवान सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हा अध्यक्ष शफीक रचभरे, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान शेख, कार्याध्यक्ष राजूभाई हु’डेकरी, लक्षमन भोसले,अनिल उकरंडे, तन्वीर गुलजार,अमजद पठाण, बशीर सय्यद, रिजवान दंडोती,व बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.