21.7 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeसोलापूरदोन भावंडांसह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दोन भावंडांसह तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात करकंब येथील मोडनिंब रोडलगत परदेशी यांच्या शेतातील तळ्यामध्ये पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतामध्ये सख्ख्या भावंडांचा मृत्यू आहे. ही घटना शनिवारी, १३ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मनोज अंकूश पवार ( ११), गणेश नितीन मुरकुंडे ( ७), हर्षवर्धन नितीन मुरकुंडे ( ९) अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी करकंब शहरालगत मोडनिंब रोडवर परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना गावात वा-यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

या तलावातून मनोज अंकुश पवार, गणेश नितीन मुरकुंडे, संस्कार नितीन मुरकुंडे ही तीन शाळकरी मुले पडल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आणि रात्री ८ वाजता मृतदेह हाती लागले. त्यांना बाहेर काढताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तिघांचे मृतदेह रात्री शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही मुले सायंकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्याने पालकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ही मुले शेततळ्यात पडली कशी आणि नेमकी किती वाजता पाण्यात पडली हे कोणालाही सांगता येत नव्हते. या दुर्दैवी घटनेने करकंबवर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नोंदीचे काम सुरू होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR