15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeउद्योगइंडोमोबिल हिरो टू व्हीलर मेकॅनिक मेळावा उत्साहात

इंडोमोबिल हिरो टू व्हीलर मेकॅनिक मेळावा उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
हिरो मोटोकॉर्पचे लातूरचे अधिकृत विक्रेते इंडोमोबिल हिरो यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील टू व्हीलर मेकॅनिकचा मेळावा शुक्रवारी हॉटेल अतिथी येथे पार पडला. या मेळाव्यातलातूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिरोच्या गाड्यांमधील नवीन टेक्नॉलॉजीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्यासाठी इंडोमोबिल हिरोचे सीओओ सत्यजित देशमुख, हिरो कंपनीचे टेरेटरी सेल्स मॅनेजर सूरज झंवर, सर्व्हिस मॅनेजर दीपक सोनी, स्पेअर पार्ट मॅनेजर संकेत जोशी आदी उपस्थित होते. यावेळी हिरो मोटोकॉर्पच्या वाटचालीबद्दल सूरज झंवर यांनी मार्गदर्शन केले. कंपनीच्या यशात सर्व मेकॅनिकचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कंपनी मेकॅनिकचे वेळोवेळी मेळावे घेऊन त्यांना नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देत असते. तसेच कायद्याविषयीही माहिती दिली जाते, असे ते म्हणाले. दीपक सोनी यांनी सर्व्हिसबद्दल माहिती दिली.

बदलत्या काळानुसार गाड्यांमध्ये कसे बदल होत गेले, याबद्दल माहिती दिली. तसेच संकेत जोशी यांनी सर्व मेकॅनिकनी सर्व्हिसिंगसाठी येणा-या गाडीला कंपनीचे ओरिजिनल पार्ट वापरावेत, असे सांगितले. यावेळी इंडोमोबिलचे सीओओ सत्यजित देशमुख यांनी मेकॅनिकसाठी सेल्स रेकरल योजनेची माहिती दिली. तसेच यामध्ये जे मेकॅनिक सहभागी होणार आहेत. त्यांनी इंडोमोबिल हिरो कार्यालयात संपर्क साधावा, असे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR