29.8 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूर‘इंडोमोबिल हिरो’मध्ये नव्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

‘इंडोमोबिल हिरो’मध्ये नव्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

लातूर : प्रतिनिधी
हिरो मोटोकॉर्पचे लातूरचे अधिकृत विक्रेते इंडोमोबिल हिरो यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील टू व्हीलर मेकॅनिकचा मेळावा शुक्रवारी हॉटेल अतिथी येथे पार पडला असून या मेळाव्यातलातूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी हिरोच्या गाड्यांमधील नवीन तंत्रज्ञानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हिरो मोटोकॉर्पच्या वाटचालीबद्दल सूरज झंवर यांनी मार्गदर्शन केले. कंपनीच्या यशात सर्व मेकॅनिकचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कंपनी मेकॅनिकचे वेळोवेळी मेळावे घेऊन त्यांना नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देत असते.

तसेच कायद्याविषयीही माहिती दिली जाते, असे ते म्हणाले. दीपक सोनी यांनी सर्व्हिसबद्दल माहिती दिली. बदलत्या काळानुसार गाड्यांमध्ये कसे बदल होत गेले, याबद्दल माहिती दिली. तसेच संकेत जोशी यांनी सर्व मेकॅनिकनी सर्व्हिसिंगसाठी येणा-या गाडीला कंपनीचे ओरिजिनल पार्ट वापरावेत, असे सांगितले. यावेळी इंडोमोबिलचे सीओओ सत्यजित देशमुख यांनी मेकॅनिकसाठी सेल्स रेकरल योजनेची माहिती दिली. तसेच यामध्ये जे मेकॅनिक सहभागी होणार आहेत. त्यांनी इंडोमोबिल हिरो कार्यालयात संपर्क साधावा, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी इंडोमोबिल हिरोचे सीओओ सत्यजित देशमुख, हिरो कंपनीचे टेरेटरी सेल्स मॅनेजर सूरज झंवर, सर्व्हिस मॅनेजर दीपक सोनी, स्पेअर पार्ट मॅनेजर संकेत जोशी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR