बीजिंग : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढतोय. गेल्या काही दिवसांत जेएन.१ या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये जेएन.१ या व्हेरियंटचे रुग्ण चीनमध्ये वाढताना दिसत आहेत. चीनच्या आरोग्य विभागातील अधिका-यांनी कोविड १९ च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने या व्हेरियंटचे रुग्ण झपाट्याने वाढतील, असा इशारा दिला. भारतातही जेएन.१ चे रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनच्या इशा-यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत भारताला सतर्क राहावे लागणार आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य समितीने म्हटले की, सध्या तरी जेएन.१ या नव्या व्हेरियंटचे रुग्ण कमी आहेत. मात्र, चीनच्या आरोग्य विभागातील अधिका-यांनी एक इशारा दिला. देशात जेएन.१ हा नवा व्हेरियंटचा व्हायरल मोठा प्रमाणात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि जगातील इतर काही देशांमध्ये नव्या व्हेरियंटमुळे श्वास घेताना त्रास होतोय आणि इन्फ्लूएंजा सारखे लक्षण जाणवत आहेत.
भारतात सध्या कोरोनाची परिस्थिती काय?
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ३७५ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे ३,०७५ रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कोविड १९ मुळे दोघांचा मृत्यू झालाय. भारतात सध्या कोरोना कमी होताना दिसत आहे. जानेवारीच्या दुस-या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. ५ डिसेंबर २०२३ पासून देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढले आहेत. ६ जानेवारीपर्यंत देशातील १२ राज्यांतचे ६८२ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत बोलताना सरकारने म्हटले होते की घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र, आपल्याला सावध राहायचे आहे.
चीनला कशाची भीती आहे?
चीनमधील आरोग्य विभाग सध्या सतर्क झाला आहे. थंडीच्या दिवसांत श्वास घेण्यासाठी लोकांना समस्या निर्माण होईल, अशी शक्यता चीनकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय श्वासासंबंधित इतर आजारही वाढू शकतात. चीनमधील रुग्णालयांना नव्या व्हेंिरयटबाबत सतर्क करण्यात आले आहे. चीनने कोरोनाचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यास सुरुवात केली आहे.