सोलापूर – ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेत रविवारी संमत्ती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडल्या नंतर नंदीध्वज ६८ लिंगाना भेट देण्यासाठी रवाना झाले ते सोमवारी पहाटे हिरेहब्बु वाड्यात परतले.
दरम्यान सोमवारी सकाळी नंदीध्वज स्नानविधी सिद्धेश्वर तलाव येथे सकाळी पार पडला. रात्री १० च्या सुमारास होम मैदान येथे होम विधीचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.यासाठी नंदीध्वज सायंकाळी – पाच वाजता मिरवणूकीन मार्गस्थ झाले. होमविधीनंतर भगिनीसमाज जवळ – वासराकडून भाकणूक हा विधी पार पडला.