33.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeसोलापूरविठ्ठल कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे बँकेचे पोलिसांना पत्र

विठ्ठल कारखान्याच्या संचालकांवर गुन्हा नोंदविण्याचे बँकेचे पोलिसांना पत्र

पंढरपूर – तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने किनारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची करारानुसार परतफेड न केल्याने संचालक मंडळावर गुन्हा नोंदविण्याबाबतची तक्रार बँकेच्यावतीने पंढरपूर तालुका पोलिसांकडे करण्यात आली आहे. दरम्यान यावर तोडगा शोधण्यासाठी अध्यक्ष अभिजित पाटील हे बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाणार आहेत.

तालुका पोलिसांना हे पत्र शिखर बँकेचे अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी दिले आहे. दरम्यान या प्रकरणाने येथील कारखानदारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विठ्ठल कारखान्याने शिखर बँकेकडून कर्ज घेतले असून डिसेंबर २०२३ पर्यंत २५४ कोटी लाख रूपये कर्ज व १७७ कोटी६८ लाख रूपये व्याज इतकी रक्कम बँकेस येणे आहे. दरम्यान २०२१ मध्ये कारखाना व बँक यांच्यात करार होवून प्रतिक्विंटल साखरेवर ८०० रूपयांप्रमाणे बँकेचे देणे परत करण्याचे ठरले होते.

दरम्यान, २०२२ ला कारखान्याची निवडणूक होऊन येथे अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आले. त्यांनी हा कारखाना २०२२-२३ या हंगामात चालवून जवळपास सव्वा सात लाख टन ऊस गाळप करून ६ लाख ६४ हजार साखर पोती तयार केली. कारखान्याने करारानुसार बँकेला प्रति पोते ८०० रूपयांप्रमाणे ५३ कोटी १५ लाख रूपये देणे अपेक्षित होते. मात्र, ते पैसे बँकेत भरले गेले नाहीत. तसेच कारखान्याने उपपदार्थाची परस्पर विक्री केली आहे. बँकेबरोबर झालेल्या कराराची माहिती असताना देखील विठ्ठल कारखान्याने कर्जाची रक्कम न भरल्याने संचालक मंडळ हे वैयक्तिक व सामूदायिकरीत्या यास जबाबदार असल्याचा ठपका बँकेने ठेवला असून यासाठी अध्यक्ष अभिजित पाटील व वीस संचालकांवर फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांना पत्र देण्यात आले. याबाबतची तक्रार पोलिसात दिली गेली आहे.

दरम्यान, याबाबत अध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा करार आमच्या काळातील नसून मागील संचालक मंडळाने केला आहे. आम्ही कारखान्यात आल्यावर प्रारंभी ऊस उत्पादकांची थकीत तीस कोटींची रक्कम दिली. तसेच शिल्लक साखर विक्रीतून आलेले पैसे बँकेला भरले होते. यानंतर हंगाम सुरू केला होता. त्यावेळी ऊस उत्पादकांना पैसे देणे आवश्यक असल्याने यासाठी पैसा वापरला गेला आहे. दरम्यान शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आपण मुंबईला जात आहोत. यानंतर सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांना देऊ, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR