27.3 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeपरभणीशहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. बोर्डीकर

शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. बोर्डीकर

जिंतूर : शहरातील नागरीकांची गरज लक्षात घेता प्रत्येक प्रभाग निहाय कामे मंजूर करण्यात आली असून यापुढे देखील कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहर स्वच्छ आणि सुंदर असण्यासाठी सर्व जागरूक नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच येणा-या २२ जानेवारीला आयोध्या नगरी येथे प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने सर्वांनी याचे आनंदाने स्वागत केले पाहिजे असे आ. मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

शहरातील रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था लक्षात घेता नगर विकास विभागामार्फत २ कोटी ६० लक्ष रुपयांच्या विविध प्रभागामधील रस्त्यांचे आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आ. बोर्डीकर बोलत होत्या. या प्रसंगी त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, विकी भैय्या बोर्डीकर, तालुकाध्यक्ष विनोद राठोड, डॉ.पंडित दराडे, लक्ष्मण बुधवंत, सुनील भोंबे, गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, संगीता जाधव, माधव दराडे, किशोर जाधव, रवी घुगे, संदीप घुगे, कैलास खंदारे, सुनीता वाकोडे, गुनिरत्न वाकोडे, संतोष राठोड, रामराव हुलगुंडे, मुसा, फिरोज, बंटी जाधव, गोविंद लहाने, इमरान कच्ची, पिंटू महाजन, गणेश दराडे, युवराज घनसावंत, विकास मोरे, सुमेध सूर्यवंशी, आकाश चराटे, रमेश गुजर, शिवाजी कदम, पांडुरंग आडे, रामप्रसाद कंठाळे, राजा नगरकर, सचिन रायपत्रीवार, अजमतखान पठाण, महेश देशमुख, बाबा राज, बार्शीकर ताई, खंडागळे, गणेश केशरखाने आदी उपस्थित होते.

शहरात होणा-या विकास कामात बलसा रोड किशोर जाधव यांचे घर ते रामा वाकळे यांचे घरापर्यंत, संतोष राठौर यांचे घर ते मारोती मंदीरापर्यंत, बलसा रोड – डोईफोडे यांचे घर ते दिगांबर रोकडे यांच्या घरापर्यंत, विसावा हॉटेल पासून अ‍ॅड. देशमुख यांच्या घरापर्यंत, घुले यांच्या घरापासून ते गरड महाराज यांचे घरापर्यंत, संजू घोडके यांचे घर ते अरुण बेले यांचे घरापर्यंत, आदर्श कॉलनी वरखेडकर यांचे घरापासून ते जुनी एकलव्य शाळेपर्यंत, बंजारा कॉलनी उत्तम राठोड ते रमेश डासाळकर यांचे घरापर्यंत, खैरी प्लॉट बुधवंत कॉम्पेक्स ते महावितरण कार्यालया पर्यंत, उभा महादेव मंदीर ते शिनगारे शेतापर्यंत, हुतात्मा स्मारक वाघमारे यांचे घर ते वावधाने घरापर्यंत, भगस यांचे घरापासून ते मते यांचे घरापर्यंत, शिवाजी नगर चौहाण स्वीट मार्ट ते थोरात फॅक्टरी पर्यंत या सर्व ठिकाणी सि.सि. रोड व नाली बांधकामाचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR