सोलापूर :- सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे या शहरात पुर्वी पासून सुत गिरण्या, कापड गिरण्या, यंत्रमाग उद्योग, विडी उद्योग, त्याच बरोबर असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार, खाजगी अस्थापनेत काम करणारे कामगार, म.न.पा., निमसरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात म्हणून सोलापूर शहराला कामगारांचे शहर म्हणून ओळख आहे. कालांतरांने विविध कारणास्तव उद्योग धंदे बंद पडले कांही उद्योग धंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यातुन ही विडी उद्योग, यंत्रमाग उद्योग, म.न.पा. कर्मचारी, खाजगी आस्थापना यात काम करणारे कामगार कांही प्रमाणात आहेत.
त्यांना ही त्यांचे कुटूंब जगविणे कठीण झाले आहे, कारण वरील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांना पुरेसा काम मिळत नाही आणि कायदेशीर हक्का पासून वंचित रहावे लागतो म्हणून त्यांना योग्य मोबदला व पुरेसे काम मिळणे गरजेचे आहे.देशाचे प्रधानमंत्री .. नरेंद्र मोदी रे. नगर घरकुल उदघाटनासाठी सोलापूरला दि.१९/०१/२०२४ रोजी येत आहेत त्यावेळी सोलापुरातील कामगारांचे खऱ्या समस्या त्यांच्या पर्यंत पोहचवून सोडवून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने, वरील उद्योगात व अस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, (शिवसेना ठाकरेगट) यंत्रमाग कामागर संघटना, (काँग्रेस) व नव महाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ (इंटक), सोलापूर म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती, अशा सर्व संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून सोलापूरातील कामगांराच्या महत्वाच्या समस्या बाबत निवेदन देणार आहोत .
प्रधानमंत्री मोदी यांचा निवेदन स्विकारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत विष्णू कारमपुरी यांनी दिले यावेळी जनार्दन शिंदे नागेश बोमड्याल सायबण्णा तेग्गेळी चांगदेव सोनवणे राजाभाऊ सोनकांबळे अंबादास तडकापल्ली सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.