18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती परीक्षेत सावळागोंधळ

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती परीक्षेत सावळागोंधळ

लातूर : परीक्षा घेणा-या यंत्रणेतल्या कर्मचा-यांनी कॉपी पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लातूर येथे दोन कर्मचा-यावर आणि एका विद्यार्थ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परीक्षा राबवणा-या यंत्रणेतच अशा प्रकारची त्रुटी असल्याने परीक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोकर भरतीसाठी डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात आली होती. लातूर येथील कॉस इन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेत परीक्षा सुरू होती. यावेळी परीक्षार्थी शैलेश सुग्रीव आंबेकर यांच्या हातातून पेपर निसटला. तेथील पर्यवेक्षकांनी तो पेपर तपासून पाहिला. त्यावेळेस तो कॉपी सदृश्य पेपर असल्याचे निदर्शनाला आलें. त्यानंतर त्यांनी त्या भागातील सीसीटीव्ही चेक केले. त्यातील प्रकार पाहिल्यानंतर पर्यवेक्षक ना धक्काच बसला कारण टाटा कन्सलन्सी सर्विसेसचे दोन कर्मचारी रमीज शेख आणि अनिस शेख यांनी सदर चीट आंबेकर नावाच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती.
याबाबतची माहिती सदर यंत्रणेला उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग उदगीर येथील उपविभागीय अभियंता लक्ष्मण देवकर यांच्या तक्रारीवरून लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी शैलेश आंबेकर रा. नरवटवाडी ता. रेणापूर आणि कॉपी पुरवणारे टीसीएसचे कर्मचारी रमिज शेख रा. लातूर आणि अनिस शेख   रा. लातूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर निर्देशित कलम परीक्षेमध्ये होणा-या गैरव्यवहार प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ चे कलम ७ भारतीय दंड विधान कलम १८८, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR