21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवधाराशिव शहरात जुगार खेळणा-या सातजणांना अटक

धाराशिव शहरात जुगार खेळणा-या सातजणांना अटक

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील आगड गल्ली येथे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पोलीसांनी तिरट जुगार खेळणा-या सात जणांना अटक केली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम असा एक लाख ४ हजार ३८० रूपयांचा माल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दि.१४ जानेवारी रोजी सायंकाळी धाराशिव शहरातील आगड गल्ली येथे छापा टाकला. यावेळी काही आरोपी पडवळ यांचे शेतातील मोकळ््या जागेत तिरट खेळत होते. पोलीसांनी आरोपी चैतन्य हनुमंत पवार, बालाजी उर्फ शुभम चंद्रकांत शिंगाडे, अजय बाळु अपुणे (गवळी), समीर मैनोद्दीन शेख, सिकंदर ईस्माईल पठाण, विनोद मुकींद बनसोडे, विरेंद्रसिंग उर्फ विरेंद्र देवानंद झेंडे, सर्व रा. धाराशिव यांना पोलीसांनी अटक केली.

त्यांच्या ताब्यातील तिरट मटका जुगाराच्या साहित्यासह ६ मोबाईल फोन, ३ मोटरसायकल असा एकूण १ लाख ४ हजार ३८० रूपयांचा माल पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलीसांनी सात जणांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायदा कलम- १२ (अ) अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR