नवी दिल्ली : इस्राइल-हमास युद्ध सुरु असताना आता इराणने इराकवर हल्ला केला. विशेष म्हणजे इस्राइलची गुप्तहेर संघटना मोसादच्या इराकमधील केंद्रावर हा हल्ला करण्यात आला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सने सांगितलं की, इराकच्या कुर्दिस्तानच्या भागात बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
मोसादचे कार्यालय आणि आयएस दहशतवादी समूहांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. सीरिया आणि इराकच्या स्वायत्त कुर्दिस्तान भागात दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणच्या सरकारी मीडियाने केला आहे.