33.5 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्ररत्नागिरी तालुक्यातून हापूसची पहिली पेटी रवाना..

रत्नागिरी तालुक्यातून हापूसची पहिली पेटी रवाना..

रत्नागिरी : खवय्यांची पहिली पसंती तर हापूस आंब्यालाच. आता या हापूसप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. रत्नागिरी तालुक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना झाली आहे. त्यामुळे लवकरच आंबाप्रेमींना आवडत्या, मधुर फळाची चव चाखता येणार आहे.

रत्नागिरीतील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार दीपक शिंदे यांच्या बागेतील आंब्याची पेटी रवाना झाली आहे. हापूस आंब्याची ही पेटी अहमदाबादच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाली असून या पेटीला २५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान बदलत्या वातावरणावर मात करत कठोर मेहनत घेतल्याने आंब्याचे चांगले पीक शेतक-याच्या हाती आले आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यात पूर्वीच विविध रोगांच्या प्रादुर्भावाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाच आता आंब्याच्या झाडावरदेखील रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. आंब्याच्या झाडाची तुरंबाफुले गळून पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सततच्या वातावरण बदलामुळे हा त्रास जाणवत असल्याचे शेतक-यांनी सांगितले आहे. आंब्याचा पिवळा तुरंबा काळा पडत असून ऐन मोड उगवणीच्या काळात तुरंबाच गळून पडत असल्याने आंब्याचा भार कमी होणार आहे. त्याचा थेट फटका आता उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR