मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यात मागील ब-याच दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. याचा पुढील टप्पा म्हणजे मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा समर्थकांसह २० जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.
तसेच २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं जाणार आहे. मात्र जरांगे पाटील हे मुंबईत धडकण्यापूर्वीच मराठा आरक्षणावर तोडगा काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. कारण राज्य सरकारकडून जरंगे यांची समजूत काढण्यासठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनोज जरांगे य यांच्या आंदोलनावर बारीक लक्ष ठेवून आहेत. तसेच मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबई देण्याची वेळ येणार नाही. राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार अशी माहिती देण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी त्यांची सरकारकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश असलेल्या एका शिष्ठमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. सरकारचा नवा ड्राफ्ट घेऊन दोघेही छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.