33.7 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रपतंगबाजीमुळे ४० जण जखमी

पतंगबाजीमुळे ४० जण जखमी

बंदीनंतरही नायलॉन मांजाचा सर्रास वापर

नागपूर : नुकताच राज्यभरात मकरसंक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचे पाहायला मिळाले. मकरसंक्रांत म्हटलं की, तिळगूळ आणि पतंग हे आलंच. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची मोठी परंपरा असते. मात्र पतंगासोबत लागणारा नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी अनेकदा त्रासदायक ठरतो. नागपुरात असाच प्रकार घडला आहे.

नागपुरात पतंगबाजी आणि हुल्लडबाजीमुळे नागपुरातील ४० जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बंदीनंतरही नायलॉन मांजाचा पतंग उडवण्यासाठी नागपुरात सर्रास वापर करण्यात येत आहे. तर बंदीनंतरही नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणे सर्वसामान्य माणसांच्या जिवावर बेतले आहे.

नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने एक दुचाकीचालक जखमी झाला आहे. हा जीवघेणा प्रकार घडल्यानंतर नायलॉन मांजासह २० जणांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या १२ जखमींवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR