नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. यादरम्यान भाजप राज्यात 32 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा 16 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही अजित पवार गटाला 6 जागा, तर शिंदे शिवसेना गटाला 10 जागा मिळणार आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान याचा थेट फायदा काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांना होण्याची शक्यता आहे. यादरम्यान महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, हर्षवर्धन पाटील, अतुल सावी, राधकृष्ण विखे पाटील हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान आजच्या भाजपच्या बैठकीत त्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.