31.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeराष्ट्रीयमथुरेतील शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण नाहीच!

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण नाहीच!

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मथुरा : मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी कमिशनर नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या खटल्याशी संबंधित सर्व प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्वत:कडे वर्ग करण्याच्या आदेशावर देखील प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे कसे वर्ग केले, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने, अलाहाबाद हायकोर्ट मेंटेनेबिलिटी प्रकरणावर सुनावणी करू शकते, परंतु उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कमिशनरची नियुक्ती होऊ देऊ शकत नाहीत.
यावेळी सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षाच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित करत तुमचा अर्ज अतिशय अस्पष्ट असल्याचे म्हटले.

तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगावे लागेल. याशिवाय बदलीचे प्रकरणही या न्यायालयात प्रलंबित आहे. आम्हाला त्यावरही निर्णय घ्यायचा आहे असे सांगितले.
कोर्ट कमिशनरच्या नियुक्तीविरोधात मुस्लिम पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ जानेवारीला होणार आहे.

१४ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्यास परवानगी दिली होती. या प्रकरणात, याचिकाकर्त्यांनी दावा केला होता की त्या मशिदीमध्ये हिंदू प्रतीके आहेत, ज्यावरून ते एकेकाळी हिंदू मंदिर होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR