पुणे : पुण्यात उच्चभ्रू परिसरात सध्या सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर येत आहे. पुण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. वेश्याव्यवसाय करणा-या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. विदेशातून हा वेश्याव्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन वेश्याव्यवसाय सुरू केला होता. राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उझबेकिस्तानी मॉडेलला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उझबेकिस्तानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाईन वेश्याव्यवसाय करत होत्या. विदेशातून ऑनलाईन पद्धतीने वेश्याव्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे .
वेश्याव्यवसाय ऑनलाईन पद्धतीने चालवणा-या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली होती.