मुंबई : ईशा देओल व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या नात्यात दुरावा आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. आजवर दोघांनीही अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांची लेक ईशा देओलदेखील बॉलिवूडचा भाग आहे. पण आपल्या आई-वडिलांप्रमाणे तिला यश मिळालेले नाही.
बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, ईशा आणि भरत कोणत्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये एकत्र दिसून आलेले नाहीत.
तसेच एकमेकांसोबतचे फोटोही त्यांनी शेअर केलेले नाहीत. ईशाचा पती भरत याचे विवाहबा संबंध असल्याचे समोर आले आहे. याच कारणाने त्यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. भरतची गर्लफ्रेंड बंगळुरूमध्ये राहणारी आहे. अद्याप देओल कुटुंबीयांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
ईशा आणि भरत यांचा घटस्फोट होणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे नेटक-यांनी भरतला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. भरतचे त्याच्या कुटुंबीयांवर आणि पत्नीवर खूप प्रेम आहे असे वाटायचे पण हे सर्व नाटक आहे, ईशासोबत असे व्हायला नको होते.