मुंबई : मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटच्या पदार्थात मृत उंदीर सापडल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला आहे. या घटनेनंतर ती व्यक्ती ७५ तास रुग्णालयातच होती.
प्रयागराजमधील रहिवासी असलेली एक व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरात कामानिमित्त आली होती. त्यावेळी भूक लागल्याने या व्यक्तीने मुंबईतील ‘बार्बेक्यू नेशन’मधून शाकाहारी पदार्थ ऑर्डर केला होता.
बार्बेक्यू नेशनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, असा दावाही पीडित व्यक्तीकडून करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने ट्वीटरवर एक ट्वीट करत याप्रकरणी मदतीची मागणी केली आहे.
पीडित राजीव शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, पीडित व्यक्ती ८ जानेवारी २०२४ रोजी प्रयागराजहून मुंबईत आला होती आणि त्या व्यक्तीने ‘बार्बेक्यू नेशन’मधून शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली. ऑर्डर आली आणि व्यक्तीने जेवण्यासाठी जेवणाचे डबे उघडण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्यातील एका डाळीच्या डब्यात मेलेला उंदीर आढळून आला. जेव्हा व्यक्तीला हा उंदीर दिसला तोपर्यंत फार उशीर झाला होता.
ज्या पदार्थात मेलेला उंदीर आढळून आला, तो पदार्थ त्या व्यक्तीने खाल्ला होता. यामुळे व्यक्तीची प्रकृती खालावली होती आणि त्यासाठी तब्बल ७५ तासांहून अधिक काळ त्याला रुग्णालयात अॅडमिट व्हावे लागले होते. तसेच, याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केलेला नाही.
पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही; पीडित व्यक्तीचा दावा
पोलिसांनी एफआयआर न नोंदवल्याबाबत सोशल मीडिया हँडलवर माहिती देताना पीडिताने सांगितले की, मी ८ जानेवारीला प्रयागराजहून मुंबईला गेलो होतो, तिथे मी ‘बारबेक्यू नेशन’मधून शाकाहारी पदार्थ ऑर्डर केले होते, त्यात मेलेला उंदीर सापडला होता. यानंतर प्रकृतीच्या चिंतेमुळे मला ७५ तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात मी पोलिसांत तक्रार दाखल केली असून नागपाडा पोलिसांनी अद्याप माझा एफआयआर नोंदवलेला नाही.