नवी दिल्ली : अदानी समूह मीडिया क्षेत्रात झपाट्याने आपले पाय पसरवत आहे. ‘एनडीटीव्ही’ मधील बहुसंख्य भागभांडवल संपादन केल्यानंतर, अदानी समूहाने ‘एआयएनएस इंडिया’ मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्सने हा हिस्सा खरेदी केला होता. कंपनीने सांगितले की संपादनाची किंमत 5 कोटी आहे.
यामुळे एएमजीची वृत्तसंस्थेतील भागीदारी आता 50.5 टक्क्यांवरून 76 टक्क्यांवर पोहोचली आहे. यापूर्वी एएमजीने एनडीटीव्ही ग्रुपलाही आपला भाग बनवले होते.
कंपनीने नियामक फाइंिलगमध्ये माहिती दिली की मतदान अधिकार श्रेणीमध्ये एएमजीचा हिस्सा 76 टक्के आणि गैर-मतदान अधिकार श्रेणीमध्ये 99.26 टक्के झाला आहे.
कंपनीने सांगितले की ‘एआयएनएस’ ची बोर्ड मींिटग 16 जानेवारीला झाली होती. यामध्ये शेअर्स खरेदीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली.
मीडियातही अदानी आणि अंबानींची स्पर्धा
देशातील दोन आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आता वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणेच माध्यमांमध्येही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अदानी समूहातील कंपन्या एनडीटीव्ही यांची थेट स्पर्धा रिलायन्सच्या न्यूज 18 आणि मनीकंट्रोलशी आहे.
अदानी यांनी मार्च 2022 मध्ये बिझनेस आणि फायनान्शियल न्यूज डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइमचे संचालन करणा-या क्विंटिलियन बिझनेस मीडियाचे अधिग्रहण करून मीडिया उद्योगात प्रवेश केला. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये ‘एआयएनएस’मधील सुमारे 65% हिस्सा विकत घेतला.