30.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात हंगामातील पहिली हापूसची पेटी दाखल

पुण्यात हंगामातील पहिली हापूसची पेटी दाखल

पुणे : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस आंबा त्याच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही भाव खातो. संक्रांतीनंतर हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे.

पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीला २१ हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत ४४० रुपये आहे.

पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. त्या आंब्याची विधीवत पूजा आज करण्यात आली. यंदा एक महिना आधीच रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. सध्या आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे. यामुळे आंब्याला फळांचा राजा म्हणतात. आंबा एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR